श्री देव नारायण मंदिर आसोली

श्री देव नारायण मंदिर आसोली

सिंधुदुर्ग जिल्‍हयातील वेंगुर्ला तालुक्‍यात नैसर्गिक साधन सपत्तीने समृद्ध असलेल्या या आसोली गावात श्री देव नारायणाचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. मंदिराला चार गाभारे असून अंतर्गत मुख्य गाभारा आहे. त्यात श्री देव नारायणाची विलोभनीय अशी हरिहरेश्वर स्वरूप पुरातन मूर्ती आहे. मूर्तीवर इ.स. ९०० असे कोरलेले आहे, या वरून मूर्तीचा कालावधी लक्षात येतो.

या पुरातन मूर्तीचे अवलोकन केले असता, ही गंडकी नदीतील शाळीग्राम अखंड शिलेतून महिरपीसह कोरलेली ३.५ (साडेतीन) फूट उंचीची मूर्ती आहे. सदर मूर्तीची स्थापना धुरी घराण्यातील पूर्वजाने केलेली आहे. तसा ऊल्लेखही सादर मूर्तीवर पाहावयास मिळतो. श्री देव नारायण चंडीवर उभा आहे. श्री देव नारायण म्हणजेच त्रिगुणात्मक आहे. श्री देव नारायणाचे मस्तक हे लिंग स्वरूप असल्याने, जसे शिवलिंगावर असते तसे अभिषेक पात्र येथेही पाहावयास मिळते. मूर्तीच्या भोवती असलेल्या महिरपीवर पायथ्याशी डाव्या बाजूला मारुती आणि उजव्या बाजूला गरुड व प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहे.

Scroll to Top