ग्रामपंचायत आसोली

परिचय

ग्रामपंचायत आसोली

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये आसोली ग्रामपंचायत येते. आसोली गावाच्या परिचयासाठी काही प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे: 

  • स्थान: आसोली हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
  • प्रशासकीय माहिती: आसोली ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
  • आकर्षण: आसोली ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देव नारायण मंदिर, श्री देव गावडेश्वर मंदिर, न्हैचिआड खाडीतील पर्यटन, सुरंगीची झाडे हे आहे.
  • गावातील प्रसिद्ध  फळे : आंबा, फणस, काजू, कोकम, जांभूळ, करवंदे.
  • गावातील प्रसिद्ध  फूलझाडे : सुरंगी, आबोली, जाई, जूई, मोगरा, चाफा.
  • गावातील प्रमुख खाद्य पदार्थ : मासे, भात, वडे, सागोती, कुर्ली(खेकडा), घावणे, शेवया, कुळथाचे पिठले, सोलकडी, सातकापे  घावणे.
  • गावातील खरेदी योग्य वस्तू : कोकम, आमसूले, सरबत, काजू गर, मालवणी खाजा, फळांचे जाम, कुळीथ पिठी, शेंगदाणा लाडू.

आसोली गावाची माहिती

“अशा लाल मातीत जन्‍मास यावे जीचा रंग रक्‍तास दे चेतना”
असे कवी वसंत सावंत यांनी ज्‍या भूमीचे वर्णन केले त्‍या कोकणच्‍या भूमीचा आसोली हा अविभाज्‍य भाग. सिंधुदुर्ग जिल्‍हयातील वेंगुर्ला तालुक्‍यात असलेले आसोली गाव हे नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे.

श्री देव नारायण मंदिर, श्री देव रवळनाथ मंदिर, श्री देव गिरोबा मंदिर, श्री देव गावडेश्‍वर मंदिर, श्री देव वेतोबा मंदिर अशी अनेक मंदिरे गावात आहेत. पाल, मातोंड, धाकोरे, टांक, या गावांना जोडणा-या  आसोली गावाच्या उत्तरेस १ कि. मी. लांबीचा मोचेमाड खाडी किनारा लाभलेला आहे. आसोली गावापासून फक्त ५ कि. मी. अंतरावर प्रसिद्ध वेतोबा मंदिर असून उत्तरेस १० कि. मी. अंतरावर वेंगुर्ला शहर आहे.

गावात निवास व न्याहारी  सुविधा पुरविणा-या कुटुंबांची यादी:
१. सौ. रजनी दिगंबर कांबळी
२. श्री .हरी विष्णू करेलकर
३.श्री. दिपक सावळाराम घाडी
४. श्री. सहदेव विष्णू घाडी

ग्रामपंचायतीची रचना

ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत आसोली

0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण क्षेत्रफळ (हे.)
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण कुटुंब संख्या
एकूण दारिद्रयरेषेखालील कुटुंब
एकूण धार्मिक स्थळे
सार्वजनिक विहिरी (जि. प.)
खाजगी विहिरी
नळयोजना कनेक्शन
0
एकूण अंगणवाडी संख्या
0
एकूण पूर्व व पूर्ण प्राथमिक शाळा
0
एकूण माध्यमिक शाळा

ग्रामपंचायत आसोली

आसोली ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय आसोली
गाव : आसोली
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २२७१५३
ई-मेल : asoli07@gmail.com

Scroll to Top